६० सेकंदात बना `फेसबुक फिल्म हिरो`

आपण आत्तापर्यंत शेअर केलेल्या फोटोमधून आणि व्हिडिओमधून फेसबुकच्या एका अॅप्लिकेशनद्वारे एक शॉर्ट फिल्म तयार होते. यामध्ये तुम्हाला तुमचाच फेसबुक प्रवास पुन्हा एकदा पाहायला मिळतो...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 6, 2014, 10:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नुकतीच फेसबुक या सोशल वेबसाईटनं दशकपूर्ती केलीय. फेसबुक युजर्सला आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी देऊन त्यांच्या जीवनातले खास क्षण इतरांबरोबर शेअर करण्याची संधी, फेसबुकनं त्यांना उपलब्ध करून दिली... आता, हेच क्षण केवळ ६० सेकंदांत पुन्हा एकदा डोळ्यांसमोर घालून त्या क्षणांत पुन्हा रमून जाण्याची संधी फेसबुकनं आपल्याला उपलब्ध करून दिलीय. दशकपूर्ती निमित्तानं हे खास गिफ्ट फेसबुकनं आपल्या युजर्सला उपलब्ध करून दिलंय.
आपण आत्तापर्यंत शेअर केलेल्या फोटोमधून आणि व्हिडिओमधून फेसबुकच्या एका अॅप्लिकेशनद्वारे एक शॉर्ट फिल्म तयार होते. यामध्ये तुम्हाला तुमचाच फेसबुक प्रवास पुन्हा एकदा पाहायला मिळतो... आणि आपला हा प्रवास इतरांशी शेअरही करता येतो. `लूक बॅक` असं या शॉर्ट फिल्मला नाव देण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये तुमचे २० सर्वाधिक लाईक केलेले फोटो, स्टेटस आणि लाईफ इव्हेंट म्युझिकसह आपल्या डोळ्यांखालून जातात.
https://www.facebook.com/lookback/e या लिंकच्या साहाय्यानं तुम्ही तुमची फेसबुक शॉर्ट फिल्म तयार करू शकता... ज्याचे हिरो फक्त तुम्ही असाल...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.