www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुजरातमधील टाटा मोटर्सचा नॅनो कार प्रकल्प बंद करण्यात आला आहे. नॅनो कारला मागणी नसल्याने टाटा मोटर्सने आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा नॅनो कारला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्याचे कारण कंपनीतर्फे देण्यात आले आहे. हा प्रकल्प येत्या 35 ते 40 दिवसात बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
टाटा मोटर्स कंपनीने गेल्या महिन्यापासून प्रकल्पाची क्षमता कमी करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पात दोन ते तीन दिवस काम सुरु होत होते. कंपनी 2000 ते 2400 कार तयार करीत होते. मात्र, आता उत्पादन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात हा प्रकल्प महिना बंद राहणार आहे. कंपनी प्रवक्त्याने स्पष्ट केले की, कंपनीचा वार्षिक देखभाल खर्च जास्त असल्या कारणाने हा प्रकल्प बंद करण्यात येत आहे. यासाठी किमान 3 ते 6 आठवडे जातील.
या प्रकल्पातून अडीच लाख कार तयार करण्याची क्षणता होती. गेल्या वर्षात 21538 कारची विक्री झाली. तसेच सीएनजीवरील कारला लोकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारमध्ये जास्त विक्री झाली नाही. त्यामुळे टाटा आता नवीन कार बाजारात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. टाटाची काईट कार बाजारात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.