स्पाइसचा सर्वात स्वस्त डुअल सिम क्वार्टी फोन

स्पाइस मोबाइलने सर्वात स्वस्त क्वार्टी फोन सादर केला आहे. जो 1.3 Ghz डुअल कोर प्रॉसेसरवर चालतो. त्याचे नाव आहे स्टेलर 360 आणि हा अँड्रॉइड फोन आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 4, 2014, 09:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पाइस मोबाइलने सर्वात स्वस्त क्वार्टी फोन सादर केला आहे. जो 1.3 Ghz डुअल कोर प्रॉसेसरवर चालतो. त्याचे नाव आहे स्टेलर 360 आणि हा अँड्रॉइड फोन आहे.
स्पाइस स्टेलर 360 सध्या ऑनलाइन स्टोीअर्सवर 4,799 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 3.5 इंच टीएफटी एलसीडी टच स्क्रीन आहे. त्याचे रिजॉल्यूशन 480x320 पिक्सल आहे. हा टच अँड टाइप स्मार्टफोन आहे.
याचे वजन 120 ग्राम आहे. याच्या चिपसेटबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. हा अँड्राइड 4.2 जेली बीनवर आधारित आहे. याची रॅम 512MB आहे आणि यात 4जीबी इंटरनल स्टोअरेज आहे. यात माइक्रो एसडी कार्डही लावू शकतात.
हा डुअल सिम हँडसेट 3जीलाही सपोर्ट करतो. याचे दोन्ही सिम 3जीला सपोर्ट करतात. याचे इतर फीचर आहे, 2जी, वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ.
यात दोन कॅमरे आहे. रियर कैमरा 3.2 मेगापिक्सलचा आहे, यात एलईडी फ्लॅश आहे आणि याच्या फ्रंटला 1.3 मेगापिक्सल कॅमरा आहे. या मोबाइल फोनची बॅटरी 1500 एमएएचची आहे. 2जीवर 5 तासांचा टॉकटाइम देतो. कंपनी या फोनसह फ्री पाउच देत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.