एका लिटरमध्ये 3330 किलोमीटर चालणारी गाडी!

एखाद्या गाडीचं अॅव्हरेज जास्तीत जास्त 20-25 किलोमीटर प्रती लिटर असू शकतं... हे तर तुम्हाला माहित आहेच. पण, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की एक अशीही गाडी तयार झालीय जी तुम्हाला 3330 किलोमीटर प्रती लिटरचा अॅव्हरेज देऊ शकेल

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 3, 2014, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एखाद्या गाडीचं अॅव्हरेज जास्तीत जास्त 20-25 किलोमीटर प्रती लिटर असू शकतं... हे तर तुम्हाला माहित आहेच. पण, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की एक अशीही गाडी तयार झालीय जी तुम्हाला 3330 किलोमीटर प्रती लिटरचा अॅव्हरेज देऊ शकेल.
फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी ही गाडी तयार केलीय. याला फ्रान्सच्या रॉटरडममधल्या मायक्रोझोल कॉन्सेप्ट कारच्या रुपात डिस्प्ले करण्यात आलंय. ही कार रॉटरडममध्ये आयोजित करण्यात आलेल्या यूरोपियन इको-मॅरोथॉन स्पर्धेत प्रदर्शित करण्यात आलंय. या स्पर्धेचा उद्देशचं सर्वात कमी इंधन वापरणारी गाडी तयार करण्याचा होता.
सर्वात अधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये ही कार विजेती ठरलीय. यामध्ये 200 टीम्सनं सहभाग घेतला होता. या कारची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि इथेनॉलवरही चालू शकते. या गाडीची उंची खूप कमी आहे. कारचा चेसिस कार्बन फायबरचा बनलेला आहे, जो खूप हलकाही आहे. ट्रॅकवर परीक्षण केल्यानंतर या गाडीचा मायलेज 3330 किलोमीटर प्रती लिटर आढळला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.