www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
आता वॉटरप्रूफ स्मार्टफोनचा जमाना आलाय. यातच भर टाकत सोनीनं नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘सोनी एक्स्पेरिया Z1s’ हा स्मार्टफोन साडेचार फूट पाण्यात तब्बल ३० मिनिटं राहू शकतो आणि त्याच्यावर पाण्याचा काहीच परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा सुद्धा आहे.
४.५ फूट पाण्याखाली म्हणजे ही ‘एक्स्पेरिया Z’ची सुधारीत आवृत्ती आहे. ‘एक्स्पेरिया Z’ ३ फूट पाण्याखाली राहू शकणारा वॉटर रेझिस्ट फोन आहे. तर ‘एक्स्पेरिया Z1s’ हा वॉटरप्रूफ स्मार्टफोन आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीतही सोनी ‘एक्स्पेरिया झेड१एस’ ही ‘एक्स्पेरिया झेड’ची सुधारीत आवृत्ती आहे. या नवीन वॉटरप्रूफ स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा असून यात असं एक बटण आहे ज्याद्वारे पाण्याखालीसुद्धा तुम्ही स्मार्टफोनद्वारे फोटो आणि व्हिडिओ काढू शकाल.
सोनी मोबाईलचे संचालक रवी नूकाला फोनबद्दल सांगताना म्हणाले, जे फोनचे अॅक्टिव्ह यूजर्स आहेत त्यांना या फोनचा खूप वापर होईल. पाऊस आणि पाण्यात फोटोघेण्यासाठी स्मार्टफोन खूप उपयुक्त आहे.
या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा रिलेटेड आणखीही काही अॅप्स आहे:
तुम्ही काढलेल्या फोटोबद्दलची अधिक माहिती आणि फोटोचा लँडमार्कही कळेल.
२ सेंकदात ६१ शॉट्स स्नॅप काढता येतील. त्यातील मग योग्य स्माईलीज आणि एक्स्प्रेशन तुम्ही निवडू शकता.
लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि लिंक्स फेसबूकवर रिअल टाईममध्ये शेअर करता येतील.
५ इंच इतकी स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन असेल. फोनची किंमत ५२८ यूएसडी जी तुम्ही २४ महिनेच्या मासिक इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता. १३ जानेवारीपासून या फोनचे ऑनलाईन ऑर्डर सुरू होणार असून २२ जानेवारीपासून स्टोअर्समध्ये स्मार्टफोन उपलब्ध असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.