www.24taas.com,नवी दिल्ली
मोबाईल क्षेत्रात दिवसागणिक क्रांती होत आहे. नवनविन तंत्रज्ञाचा वापर करून प्रत्येक कंपनी आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. नोकीया कंपनीचे दिवाळं निघाल्यानंतर पुन्हा भरारी मारण्यासाठी नोकीया कामाला लागली आहे. आता तर सोनी कंपनीने ब्लॅकबेरी-१०ला टक्कर देण्यासाठी बाजारात ‘एक्सपेरिया’ हा नवा मोबाईल आणलाय.
जपानच्या सोनी कंपनीने ‘एक्सपेरिया’ श्रेणीतील नवा झेड हा मोबाईल हॅंडसेट बाजारात लाँच केलाय. सोनी ‘एक्सपेरिया’ झेड या मोबाईलची किंमत आहे ३८,९९० रूपये. या मोबाईलमध्ये १३ मेगा पिक्सल कॅमेरा आहे. याचा स्क्रीन ५ इंट इतका असून २जीबी पर्यंत रॅम आहे. अन्ड्राईड, क्वॅड कोअर प्रोसेसर असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
या मोबाईलचे अनावरण सध्याची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ हीने केले. ‘एक्सपेरिया’ श्रेणीतील मोबाईलसाठी कॅटची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅटच्या नावाचा हा ब्रॅंड बाजारात कसा चालतो, ते लवकरच समजेल. मात्र, ब्लॅकबेरी-१०ला ही टक्कर मानली जात आहे.
`४ जी` एक्सपेरिया टॅब्लेट झेड
एप्रिलपासून हा ‘एक्सपेरिया’ उपलब्ध होईल. कंपनीने दावा केला आहे की, ३,५००कोटी रूपयांची उलाढाल या मोबाईलच्या माध्यमातून होईल. तर सोनी कंपनीचा टॅबही बाजारात मे महिन्यापासून मिळण्यास सुरूवात होईल. यामध्ये `४ जी` तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. ‘एक्सपेरिया’ टॅब्लेट झेड असे या टॅबचे नाव असणार आहे.