इंटरनेटवर व्याख्यानमाला

इंटरनेटच्या दुरुपयोगाची अनेक उदाहरणं समोर येतायत. अशातच इंटरनेटचा विधायक उपयोग कसा होऊ शकतो, याचं आदर्श उदाहरण पुण्यातल्या एका गणेश मंडळाने ठेवलं आहे. ऑनलाईन व्याख्यानमाला ही संकल्पना विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 6, 2013, 10:14 PM IST

www.24taas.com, पुणे
इंटरनेटच्या दुरुपयोगाची अनेक उदाहरणं समोर येतायत. अशातच इंटरनेटचा विधायक उपयोग कसा होऊ शकतो, याचं आदर्श उदाहरण पुण्यातल्या एका गणेश मंडळाने ठेवलं आहे. ऑनलाईन व्याख्यानमाला ही संकल्पना विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.
इंटरनेटवर आता विविध मान्यवरांची भाषणं एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. WWW.व्याख्यानमाला.ORG या वेबसाईटवर व्याख्यानांचा खजिनाच खुला होतो. तब्बल 51 मान्यवरांची विविध विषयांवरची व्याख्यानं या वेबसाईटवर ऐकण्याची संधी आहे. हा सर्व खटाटोप केलाय धनकवडीतल्या आदर्श मित्र मंडळानं...

हृदयरोगापासून अन्न धान्य भेसळी पर्यंत, फेसबूकपासून अंतराळापर्यंत, इतिहासापासून सुरक्षेपर्यंत अशा विविध विषयांवरची तज्ज्ञांची व्याख्यानं या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही, अशा ठिकाणी मंडळ व्याख्यानमालेची सीडीही देणार आहे. सोशल साईटच्या जमान्यात व्याख्यानमालेच्या संस्कृती पासून दिवसेंदिवस दूर जाणार्या् तरुणाईला यानिमित्तानं चांगले विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.