आवडत्या व्यक्तीला द्या फेसबुकहून खास गिफ्ट

फेसबुक नेहमीच आपल्यासाठी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतं. आता देखील तुम्हांला असचं काहीसं नवं मिळणार आहे.

Updated: Sep 30, 2012, 11:01 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
फेसबुक नेहमीच आपल्यासाठी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतं. आता देखील तुम्हांला असचं काहीसं नवं मिळणार आहे. आणि ते तुम्ही दुसऱ्यांना देऊही शकता. कारण आता फेसबुकवरून तुम्हांला गिफ्ट देता येणार आहे.
फेसबुकने आता गिफ्ट हे नवे अ‍ॅप शुक्रवारी सादर केले. या नव्या अ‍ॅपमुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला ऑनलाइन गिफ्ट पाठवता येणार आहे. गिफ्टद्वारे फेसबुकने ई-कॉमर्स क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. सध्या गिफ्ट अमेरिकेत उपलब्ध असले तरी लवकरच ते जगभर लाँच करण्यात येणार आहे.
|
खरीखुरी भेटवस्तू पाठवण्यासाठी फेसबुकने साइटवर सोय केली आहे. इनबॉक्समध्ये उजव्या बाजूला गिफ्ट आयकॉन दिसणार आहे. त्यावर क्लिक करून गिफ्ट सलेक्ट करून ते संबंधितांना पाठवायचे आहे. समजा ते गिफ्ट त्या व्यक्तीला पसंत पडले नाही तर त्याच्या आवडीचे गिफ्ट निवडण्याची सुविधा यात आहे.