www.24taas.com, वृत्तसंस्था, अबूधाबी
संयुक्त अरब अमीरात जगभरातील श्रीमंत लोकांचं ठिकाण समजलं जातं. या ठिकाणी एकापेक्षा एक लग्झरी सामान मिळतं. यावेळी इथं एका आलिशान कारचा सहभाग झाला आहे. ही आलिशान कार जगातील सर्वात महागडी कार म्हणून मानली जात आहे.
इटालियन कारनिर्मीत कंपनी लँबोर्गिनीनं आपली नवीन कार ‘वेनेनो रोडस्टर’ ही अबूधाबीमधील एका जहाजावर लॉन्च करण्यात आली. या नवीन कारला पाहण्यासाठी काही निवडक श्रीमंत लोक जमा झाली होती. गल्फ न्यूज वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ‘वेनेनो रोडस्टर’ ही कार ७५० हॉर्स पावरची आहे. तसंच या गाडीत १२ सिलेंडर इंजन आहे.
या सर्वांमध्ये ही महत्वाची गोष्ट आहे की, ही गाडी २.९ सेकेंदमध्ये ० ते १०० किलोमीटरचा स्पीड पकडते. ही कार कोणत्याही धातूपासून तयार करण्यात आलेली नाही. वेनेनो रोडस्टर ही कार पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे.
या कारची किंमत १ कोटी ६० लाख दिरहम म्हणजेच भारतीय २७ कोटी ९ लाख रुपये इतकी आहे. या गाडीची ही किंमत टॅक्स न लावता सांगण्यात आली आहे. यामुळं ही कार जगातील सर्वात महागडी स्पोर्ट्स कार मानली जात आहे. या कारची किंमत जास्त असल्यामुळं कंपनीनं जगात विकण्यासाठी फक्त ९ गाड्या तयार केल्या आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.