www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
`सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड टू` हा स्मार्टफोन आजपासून भारतीय बाजारात दाखल झाला आहे. `सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड टू`ची किंमत भारतीय बाजारात २२ हजार ९९९ रुपये आहे.
सॅमसंगने या फोनची किंमत सुरूवातील उघड केली नव्हती, या फोन डिसेंबर २०१३ च्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला होता. मात्र किंमत आता जाहीर करण्यात आली आहे.
`सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड 2` हा फोन ड्युएल सिम आहे. हा `सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड`चं वर्जन आहे, `गॅलेक्सी ग्रॅण्ड`ची किंमत बाजारात 17 हजार आहे.
`गॅलेक्सी ग्रॅण्ड 2`मध्ये अनेक काही नव्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. गॅलेक्सी ग्रॅण्ड 2 या फोनमध्ये 1280x720 पिक्सेल रिझोल्युशन असणारा ५.२५ इंचीचा एचडी डिसप्ले देण्यात आलाय. मात्र यापूर्वी `गॅलेक्सी ग्रॅण्ड`मध्ये 800x480 पिक्सेल रिझोल्युशन असणारा ५ इंचीचा डिसप्ले देण्यात आला होता.
`सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड 2`मध्ये 1.2 गीगाहर्त्झ क्वॉड कोर प्रोसेसर आणि 1.5 जीबी रॅम आहे. तर पहिल्या `गॅलेक्स ग्रॅण्ड`मध्ये 1.3 गीगाहर्त्झ ड्युएल कोर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. `गॅलेक्सी ग्रॅण्ड 2`मध्ये अँड्रॉईड 4.3 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम आहे.
एलइडी फ्लॅशसह आठ मेगापिक्सेल कॅमेरा आहे, फूल एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग, पुढचा कॅमेरा 1.9 मेगापिक्सेलचा असेल. बॅटरीही 2,600 एमएएच देण्यात आली आहे.
इंटरनल स्टोअरेज 8 जीबी, जी मायक्रो एसडी कार्डचा वापर करुन 64 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हिटी सर्व ऑप्शन्स देण्यात आले आहेत, यात लेटेस्ट 3G तर वायफाय, जीपीएस/ग्लोनास यांचा देखिल समावेश केलाय.
`सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड 2`मध्ये एस ट्रॅवल, साऊंड अँड शॉट मल्टीविंडो, स्टोरी अल्बम, ग्रृप प्ले, सॅमसंग हब आणि एस ट्रान्सलेटर सारखे अनोखे फंक्शन्स आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.