मायक्रोमॅक्सचे दोन स्वस्त स्मार्टफोन बाजारात...

मायक्रोमॅक्सने ‘बोल्ट’ सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. ‘बोल्ट ए–२८’ आणि ‘बोल्ट ए-५९’ हे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च केले गेले

Updated: Jan 17, 2014, 08:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायक्रोमॅक्सने ‘बोल्ट’ सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. ‘बोल्ट ए–२८’ आणि ‘बोल्ट ए-५९’ हे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च केले गेले.
मायक्रोमॅक्स ‘बोल्ट ए–२८’
‘बोल्ट ए–२८’ हा ड्युअल सिम आहे. याला ३२० X ४८० पिक्सल रिझोल्युशनचा ३.५ इंचाचा डिस्प्ले असून एक गिगाहर्ट्झ प्रोसेसर आणि २५६ एमबी रॅमसह अँन्ड्रॉईड २.३ वर चालतो. याच्या मागील बाजुला ०.३ मेगापिक्सल कॅमेरा आहे. परंतु फ्रंट कॅमेऱ्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. ५१२ एमबी इंटरनल स्टोरेजसह १६ जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड लावता येऊ शकतं. बॅटरी १५००mAh ची आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार चार तासांचा टॉकटाइम १६० तासांचा स्टॅण्डबाय टाइम मिळेल. कनेक्टीव्हिटी ऑप्शन्समध्ये ब्लु-टूथ, वायफाय, मायक्रो-यूएसबी आणि एज इतके विकल्प आहेत. हा फोन थ्रीजीला सपोर्ट करत नाही.

मायक्रोमॅक्स ‘बोल्ट ए-५९’
‘बोल्ट ए-५९’ अँन्ड्रॉईड ४.१.१ जेलीबीन वर चालतो. ‘बोल्ट ए-५९’ हा ड्युअल सिम सपोर्ट आहे. याला ३२० X ४८० पिक्सल रिझोल्युशनचा ३.५ इंच डिस्प्ले असून एक गिगाहर्ट्झ प्रोसेसर आणि २५६ एमबी रॅम आहे. याच्या मागील बाजुला एलईडी फ्लॅशसह १.३ मेगापिक्सल कॅमेरा आहे. बॅटरी १५००mAh ची आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार चार तासांचा टॉकटाइम १६० तासांचा स्टॅण्डबाय टाईम मिळेल. कनेक्टीव्हिटी ऑप्शन्समध्ये ब्लु-टूथ, वायफाय, मायक्रो-यूएसबी आणि एज इतके विकल्प आहेत. हा थ्रीजीला सपोर्ट करतो.
कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर ‘बोल्ट ए–२८’ ची किंमत-३५९९ रूपये तर ‘बोल्ट ए-५९’ ची किंमत ४४९९ रूपये आहे. ऑनलाईन स्टोअरवर ऑर्डर केल्यानंतर ७ ते १० दिवसांत आपल्याला मिळू शकतात.