बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बोर्डाच्या घोडचुकीमुळं इंग्रजीचा बी प्रश्नसंच सोडवलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क बहाल करण्यात येणार आहेत. HSC बोर्डानं आज हा निर्णय जाहीर केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 24, 2013, 11:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बोर्डाच्या घोडचुकीमुळं इंग्रजीचा बी प्रश्नसंच सोडवलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क बहाल करण्यात येणार आहेत. HSC बोर्डानं आज हा निर्णय जाहीर केला.
बी संच प्रश्नपत्रिकेतील पाचवा प्रश्न हा LOVE AND HOW TO CURE IT या एकांकिकेतील एका उता-यावर आधारालेला होता. मात्र या उता-यात आर्थर या पात्राचं नाव जोई असं चुकीचं छापलं होतं. उता-यातली पात्र बदलल्यानं त्यावर विचारलेल्या प्रश्नांवरही त्याचा परिणाम झाला. पेपर संपल्यानंतर याची तक्रार विद्यार्थ्यांनी बोर्डाकडं केली होती. त्यावर बोर्डानं सात मार्क बहाल करण्याचा निर्णय घेतलाय. पण ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाय त्यानांच हे मार्क बहाल करण्यात येणार असल्याचं बोर्डानं स्पष्ट केलंय. आता या सगळ्या प्रकाराला प्रिंटींग मिस्टेक म्हणायची का...बोर्डाची बौद्धिक दिवाळखोरी, हाच खरा प्रश्न आहे.
यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेला 12 लाख 94 हजार 363 विद्यार्थी बसले आहेत. त्यापैकी 3 लाख 23 हजार 590 विद्यार्थ्यांनी बी प्रश्नसंच सोडवलाय.