www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अॅपलने सामान्य ग्राहक डोळ्यासमोर ठेवून सहा हजार ते १५ हजार रूपयांपर्यत मोबाईल भारतीय बाजारपेठेत आणण्याचे ठरविले. त्यानंतर सॅमसंगनेही कमी किमतीत स्मार्ट फोन देण्याची घोषणा केली. आता नोकियाने या स्पर्धेत उडी घेतली आहे. नोकियाने आता आणखी एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. तोही कमी किंमतीत आणि कॅमेरा असलेला फोन.
नोकियाचा मोबाईल हा डबल सीम, ३२ जीबी स्टोरेज क्षमता आणि कॅमेरा असलेला फोन आहे. या मोबाईलची किंमत केवळ १८०० रुपये आहे. फिनलँडची कंपनी नोकियाने नोकिया १०८ आणि नोकिया १०८ ड्युअल सिम लाँच केला आहे.
या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कमी किमतीत अशा क्वालिटीचा मोबाईल कॅमेरा उपलब्ध नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कमी किमतीत कॅमेरा देणारी नोकिया आपले मार्केट पुन्हा कसे काबीज करते याकडे लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.