www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तीन महिने वाट पाहिल्यानंतर नोकियाचा ल्युमिया सीरिजमधला ‘ल्युमिया १३२०’ फॅबलेट लॉन्च होतोय. हा फॅबलेट ‘विंडोज ८’ ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो.
ल्युमिया १३२० ची वैशिष्ट्ये…
> स्क्रीन डिस्प्ले – ६ इंच
> १.७ गिगाहर्टझचं ड्युएल कोर क्वॉलकॉम स्नॅप ड्रॅगन ४०० प्रोसेसर
> ऑपरेटिंग सिस्टम विंडोज ८
> रिअर कॅमेरा – ५ मेगापिक्सल
> फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सल (व्हीजीए)
> कॅमेऱ्यात नोकियाचा ‘प्रो कॅम’ आणि ‘स्मार्ट कॅम’ मोडही उपलब्ध
> एडिटींग आणि शेअरींगचाही ऑप्शन उपलब्ध
> रॅम – एक जीबी
> इंटरनल स्टोअरेज – ८ जीबी
> एक्सटर्नल मेमरी – ६४ जीबी पर्यंत वाढविली जाऊ शकते.
> क्लाऊड स्टोअरेज – ७ जीबीपर्यंत
> ३४०० mAH ची बैटरी
१३ जानेवारी रोजी हा फॅबलेट भारतात नोकिया स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार टूजी नेटवर्कवर हा फॅबलेट २५ तासांपर्यंत चालू शकेल तर थ्रीजी वर हा २१ तास काम करेल. भारतात याची किंमत आहे २३,९९९ रुपये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.