`सॅमसंग`चा `वाकडा-तिकडा` टीव्ही स्क्रीन

सॅमसंगने हवी तशी वळवता येणारा लवचिक टीव्ही स्क्रीन तयार केला आहे. लास वेगास येथील इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या प्रदर्शनात या टेलिव्हिजन स्क्रीनचं अनावरण करण्यात आलं.

Updated: Jan 8, 2014, 11:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सॅमसंगने हवी तशी वळवता येणारा लवचिक टीव्ही स्क्रीन तयार केला आहे. लास वेगास येथील इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या प्रदर्शनात या टेलिव्हिजन स्क्रीनचं अनावरण करण्यात आलं.
ही स्क्रीन ८५ इंच म्हणजेच २१६ सेंटीमीटर आहे. ही स्क्रीन रिमोट कंट्रोलने कंट्रोल होते.
हा स्क्रीन पाहिजे तसा वळवता येणार आहे. या आधी एलजी इलेक्ट्रॉनिक्सनेही ७७ इंच म्हणजेच १९६ सेंटीमीटरची लवचिक स्क्रीनची घोषणा केली आहे. एलजीची स्क्रीन ऑर्गेनिक लाईट-एमिटिंग डायोड तसेच ओएलइडी तंत्रज्ञानावर आधारीत आहे.
लवचिक म्हणजे हव्या तशी वाकवता येणाऱ्या या स्क्रीन ग्राहकांसाठी टेलिव्हिजन पाहण्याचा एक चांगला अनुभव असणार आहेत.
मात्र कंपन्यांसमोर एक मोठं आव्हान यात आहे. ते म्हणजे खरोखर ग्राहकांना अशा लवचिक, हव्या तशा वाकवता येणाऱ्या स्क्रीनची गरज आहे का?, या प्रश्नाचं उत्तर लवचिक टीव्ही स्क्रीनची बाजारातील मागणीवरून ठरणार आहे.
एका वेळी किती लोक टेलिव्हिजन स्क्रीनसमोर बसले आहेत, किती अंतरावर आहेत, हे पाहून हा टीव्ही स्क्रीन वाकवता येणार आहे. जर या टेलिव्हिजन स्क्रीनचा वापर होत नसेल, तर भिंतीला सपाट लावून हा टेलिव्हिजन ठेवता येऊ शकतो.
मात्र जाणकारांच्या मते बाजारात अशा कुठल्याही टीव्ही स्क्रीनची मागणी नाही. मात्र एक वेगळ प्रॉडक्ट बाजारात आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.