४१ मेगापिक्सलचा कॅमेऱ्यासहीत `ल्युमिया १०२०`

मोबाईल कंपनी नोकियानं आपला बहुचर्चित कॅमेरा फोन ल्यूमिया १०२० गुरुवारी भारतात लॉन्च केलाय. ११ ऑक्टोबरपासून भारतातल्या बाजारात हा फोन उपलब्ध होऊ शकेल. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे ‘४१ मेगापिक्सल’चा कॅमेरा…

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 27, 2013, 04:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोबाईल कंपनी नोकियानं आपला बहुचर्चित कॅमेरा फोन ल्यूमिया १०२० गुरुवारी भारतात लॉन्च केलाय. ११ ऑक्टोबरपासून भारतातल्या बाजारात हा फोन उपलब्ध होऊ शकेल. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे ‘४१ मेगापिक्सल’चा कॅमेरा…
या फोनची किंमत काय असेल याचा खुलासा मात्र अद्याप कंपनीनं केलेला नाही. परंतु हा फोन बाजारात ४७,००० – ४८,००० पर्यंत उपलब्ध होऊ शकेल, असा अनुमान बांधला जातोय. इतर देशांत हाच फोन ८०० डॉलरमध्ये उपलब्ध आहे.
नोकियाचे भारताचे मॅनेजिंग डायरेक्टर पी. बालाजी यांच्या म्हणण्यानुसार, नोकियाच्या ल्यूमियाला ग्राहकांनी चांगलीच पसंती दर्शवलीय. याआधी लॉन्च झालेल्या सीरिजला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. नोकिया १०२० नोकियाची स्थिती आणखी मजबूत करू शकते.

या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे ३८ मेगापिक्सल तसंच पाच मेगापिक्सल फोटो एकत्र घेता येऊ शकते. ल्युमिया रेंजमध्ये कंपनीचे आत्तापर्यंत १३ मॉडल बाजारात आहेत. ल्युमिया १०२० विंडोज-८ वर आधारित आहे. यात ३२ जीबी स्टोरेज क्षमता उपलब्ध आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.