www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच २४७२ कोटीच बजेट आहे.पालिकेच्या या शिक्षण विभागात ३३ टक्के पदच रिक्त असल्याच माहीतीच्या अधिका-यात उघड झालं आहे. यात पालिकेच्या इंग्रजी माध्यमासाठी सुरू करण्यात आलेल्या पब्लिक स्कूलमध्ये ५७ टक्के शिक्षक पद भरलीच गेली नाही आहेत. तर शिक्षण विभागातील ७०८ पदापैकी २२८ पद रिक्त आहेत.या शिक्षण विभागाची रिक्तपदामुळे पालिकेची दैनावस्था उघड झाली आहे.
शिक्षण अधिकार कायद्यानुसार ३२ विघार्थ्यांमागे १ शिक्षकाची गरज आहे.मात्र पालिकेन इंग्रजी माध्यमासाठी सुरू करण्यात आलेल्या पब्लिक स्कूलमध्ये ५७ टक्के शिक्षक पद भरलीच गेलेली नाहीत.पालिकेच्या या शिक्षण विभागात ३३ टक्के पदच रिक्त असल्याच माहीतीच्या अधिका-यात उघड झालयं.पालिकेन उपशिक्षणाधिकारी,प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक, लिपिक, मुख्य लिपिक, शाळा निरिक्षक अशी पदच गेली दहा वर्षं भरली गेलेली नाहीत.पालिकेच्या शिक्षण विभागातील ७०८ पदापैकी २२८ पद रिक्त असल्यामुळे पालिकेचा शिक्षण विभागाचा दर्जा का खालावलाय हे उघड होतयं.
शिक्षण विभागातील ३३ टक्के रिक्त पदाबद्दल विचारल असता. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणानी उत्तर देण्याच टाळलयं.तर महापौरानी रिक्त पदाची छाननी करून निर्णय घेऊ अस बचावात्मक उत्तर दिलं आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच २४७२ कोटीच बजेट आहे.शिक्षण विभागाचा दर्जा वाढवण्यासाठी पालिका व्हर्च्युअल क्लासरूम ,शालेय २७ मोफत वस्तूच वाटप करते.तसच विघार्थ्यांना सुंगधी दूध योजनाही पालिकेन सुरू केलीयं.या सर्व योजना फेल ठरल्यात.याच मुख्य कारण म्हणजे शिक्षण विभागातील ३३ टक्के पदच भरली न गेल्यामुळे पालिकेचा शाळामध्ये विघार्थ्याच गळतीच प्रमाण वाढतंय. या योजना प्रत्यक्षात अंमलात आणा-या अधिका-यांची वानवा असल्यामुळे शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.