कमी किंमतीची टाटा मोटर्सची नवी नॅनो ट्विस्ट दाखल

टाटा मोटर्सने आपल्या नॅनो कारच्या नव्या मॉडेलची दिमाखदारपणे एंट्री केली आहे. दिल्लीतील एका शोरूममध्ये नॅनोची नवीन नॅनो ट्विस्ट दाखल झाली आहे. या कारची किंमत आहे २.३६ लाख रूपये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 15, 2014, 10:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टाटा मोटर्सने आपल्या नॅनो कारच्या नव्या मॉडेलची दिमाखदारपणे एंट्री केली आहे. दिल्लीतील एका शोरूममध्ये नॅनोची नवीन नॅनो ट्विस्ट दाखल झाली आहे. या कारची किंमत आहे २.३६ लाख रूपये.

नवीन नॅनो ही इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड स्टीयरिंग प्रणाली (ईपीएएस) यावर आधारित आहे. त्यामुळे नॅनो चालविण्यात चांगला अनुभव मिळेल. तर नॅनोटेक्नॉलॉजीचा हा नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म विलक्षण आहे, अशी माहिती टाटा मोटर्स पॅसेंजर मोटर व्हिकल बिजनेस युनिटचे अध्यक्ष रणजीत यादव यांनी सांगितले.
टाटा मोटार कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एक लिटर पेट्रोलला २५.४ किलोमीटर मायलेज देईल. या नॅनो ट्विस्टचे इंजिन ६२४ सीसी, मल्टीप्‍वाइंट फ्यूल इंजेक्टेड दोन सिलिंडर पेट्रोल इंजिनचा या कारमध्ये वापर करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.