माझगांव डॉक लिमिटेडमध्ये मेगा भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2014, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 4 जूनपासून हे अर्ज अपलब्ध असून 03 जुलैपर्यंत करता येऊ शकतात. (Online Application opens from 04.06.2014 and closes on 03.07.2014
यामध्ये मास्टर क्लास टू - १ जागा, ज्यु. ड्राफ्टसमन १९ जागा, ज्यु. प्लॅनर एस्टिमेटर-मेकॅनिक १२ जागा, ज्यु. प्लॅनर एस्टिमेटर-इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक १० जागा, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक - मेकॅनिक १७ जागा, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक-इलेक्ट्रिकल ३ जागा, भांडारपाल १० जागा, फिटर २८१ जागा, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर २६० जागा, पाईप फिटर २९२ जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ५५ जागा, पेंटर ५९ जागा, सुतार ४२ जागा, कंम्पोझाईट वेल्डर १७४ जागा, रिगर १२८ जागा, मॅकॅनिस्ट १४ जागा, कॉम्प्रेसर अटेंडंट ३ जागा), डिझेल क्रेन ऑपरेटर १ जागा), सुरक्षा शिपाई २१ जागा, युटिलिट हँड १२७ जागा, आणि चिपर ग्राईंडर ही १०४ पदे भरण्यात येणार आहेत.
यासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आणि यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पाहा जाहीरात इथं क्लिक करा
पाहा - ऑनलाईन अर्जासाठी क्लिक करा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.