www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नवीन वर्षात नोकरीची एक खूप चांगली संधी तरुणांसमोर येतेय. नव्या वर्षात इन्फोसिसमध्ये तब्बल १६ हजार जागांची भरती होणार आहे. त्यामुळं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले आणि घेत असलेल्यांना उत्तम संधी निर्माण होणार आहे.
नोकरीसाठी सर्व उमेदवार इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले आणि नवे उमेदवार असणार आहेत. इन्फोसिसचे अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिलीय. नारायण मूर्ती म्हणाले, `पुढील वर्षासाठी कर्मचारी घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. एकूण १५ हजार ते १६ हजार माणसांची कंपनीला आवश्याकता आहे.
देशाचा आयटी उद्योग १०८ अब्ज डॉलरचा आहे. त्यातच आता अमेरिका आणि युरोप इथून कामं आऊटसोर्स करण्याचं प्रमाण हळूहळू वाढतंय. अमेरिका आणि युरोपमधून देशाच्या आयटी उद्योगाच्या एकूण उत्पन्नाच्या ८० टक्के उत्पन्न तयार होतंय. या दोन्ही प्रदेशांतील परिस्थिती आऊटसोर्सिंगसाठी अनुकूल बनत असल्यानं मागील वर्षापेक्षा आगामी वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे.
या पार्श्वकभूमीवर एकंदर विकासाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची दखल घेऊन विकासासाठी देशानं खंबीर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं नारायण मूर्ती म्हणाले. तेव्हा सर्व इंजिनिअर्सनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.