एचपीचा आता `व्हाईस टॅबलेट` स्मार्टफोन

स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता आणखी एका स्मार्टफोनची भर पडणार आहे. १५ हजार रूपयांमध्ये अॅपलचा आयफोन-४ मिळणार आहे. आता तर अमेरिकन कंपनी एचपीने आपला नवा स्मार्टफोन भारतात आणण्याचा इरादा पक्का केलाय. पुढील आठवड्यात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 16, 2014, 05:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सॅन फ्रान्सिस्को
स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता आणखी एका स्मार्टफोनची भर पडणार आहे. १५ हजार रूपयांमध्ये अॅपलचा आयफोन-४ मिळणार आहे. आता तर अमेरिकन कंपनी एचपीने आपला नवा स्मार्टफोन भारतात आणण्याचा इरादा पक्का केलाय. पुढील आठवड्यात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.
मोबाईल ग्राहकांसाठी `व्हाईस टॅबलेट` हा मोठ्या आकाराचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा एचपीने केली आहे. पुढील आठवड्यात तो लॉन्च केला जाणार आहे. २०११मध्ये पाम डिव्हाईसेसचं उत्पादन बंद केल्यानंतर अमेरिकेच्या या कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनची स्क्रीन सहा इंच आणि सात इंच असेल. या टॅबलेटमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचा असेल. शिवाय यामध्ये पॉवरफूल क्वाड कोर प्रोसेसर असून युझर्सना अनेक अॅप एकाच वेळी वापरता येऊ शकतील. एचपी स्लेट-६ आणि एचपी स्लेट-७ हे ड्युएल सीमचे टॅबलेट आहेत. यामध्ये फ्रंट आणि बॅक कॅमेरा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.