www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
कट्टर इस्लाम पाळणाऱ्या मुस्लिमांसाठी गुगलने ‘हलाल गुगलिंग’ हे नवं सर्च इंजिन लाँच केलं आहे. इस्लाम संस्कृती टिकवता यावी, यासाठी हे ‘मुस्लिम स्पेशल’ सर्च इंजिन डेव्हलप करण्यात आलं आहे.
हलाल गुगलिंगचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्च इंजिनवर इस्लामला हराम असणारी कुठलीही गोष्ट सर्च होणार नाही. हलाल गुगलिंगद्वारे मुस्लिमांच्या धार्मिक भावना जपल्या जाणार आहेत. इस्लाममध्ये निषिद्ध मानली गेलेली कुठलीही गोष्ट या सर्च इंजिनवर सर्च होणार नाही. त्यामुळे अश्लील मजकूर, अश्लील फोटो या सर्च इंजिनमध्ये दिसणार नाही. अशी सिस्टम असणारं जगातलं हे पहिलं सर्च इंजिन आहे.
नग्न फोटो, गे, लेस्बियन असे शब्द असणारे एकही लिंक या सर्च इंजिनवर दिसणार नाही. या सर्च इंजिनवर सर्व हराम मजकूर फिल्टर केला आहे. हलाल गुगलिंगच्या सेटिंगमध्ये ब्लॅक लिस्टमधील वेबसाइट्सची नावंही देण्यात आली आहेत. हलाल गुगलिंगवर इस्लामला हराम असणारा मजकूर अनावधाने आढळल्यास त्याचा रिपोर्ट करण्याचीही व्यवस्था आहे. अनेक वर्षं या सर्च इंजिनसाठी गुगलची एक विशेष टीम कार्यरत होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.