www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
इंटरनेट विश्वातील बलाढ्य कंपनी गुगलने मराठी बाणा जोपासलाय. त्यामुळे मराठीचा झेंडा इंटरनेटच्या विश्वात जोमाने फडकणार आहे. गुगलनेही आता `मराठी` बाणा स्वीकारला आहे. संपूर्ण जगात वापरल्या जाणाऱ्या गुगल या शोध संकेतस्थळारील भाषांतराच्या सुविधेत आता मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे.
भारतात सुमारे ७३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्राचा मायबोली मराठी भाषा आहे. मराठी भाषांतराची सुविधा अचूक आणि प्रगत करण्यासाठी गुगलचा चमू काम करीत असून, लवकरच इतर भाषांप्रमाणे आम्ही अचूकपणे भाषांतर करू, असे गुगलने आपल्या ब्लॉगवर दिले आहे. मराठीसह अन्य चार भाषा वाढल्याने आता गुगल जगातील तब्बल ७० भाषांचे भाषांतर करणार आहे.
इंटरनेट विश्वात इंग्रजीचा मराठी अनुवाद आणि मराठीचे इंग्रजीत भाषांतर करणे त्यामुळे सहज शक्य झाले आहे. इंटरनेटच्या युगात बहुतेक माहिती ही इंग्रजीतच उपलब्ध आहे. अशावेळी एखाद्या गोष्टीचा शोध घेत असताना एखाद्या इंग्रजी शब्दामुळे पूर्ण वाक्याचाच अर्थ कळेनासा होतो. मेल टाईप करताना वयोवृद्ध लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते. आता या त्रासातून सुटका होणार आहे.
गुगल भाषांतराच्या सुविधेत मराठीचा समावेश झाला असला तरी याआधी गुगलवर हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलगू आणि उर्दूतील भाषांतर करता येत होते. बोस्निया आणि हर्जगोव्हिना प्रांतातील `बोस्नियन`, फिलिपाइन्समधील सीब्युनो, इंडोनेशियातील जावनीज आणि चीन, व्हिएतनाम, लाओस, थायलंड आणि संपूर्ण युनायटेड स्टेटसमध्ये बोलल्या जाणार्याव माँग या भाषेचाही समावेश गुगल भाषांतरात केला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.