गुगलमधून करा ताजमहालाची `व्हर्च्युअल टूर`

जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 20, 2014, 08:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही. कारण, ३६० अंशातून ताजमहालासहीत भारतातील आणखी बरीचशी ऐतिहासिक स्थळं तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहेत.
गुगलनं ताजमहालसहीत भारताच्या ऐतिहासिक स्मारकांची ३६० अंशातील फोटो जाहीर केलेत. गुगलच्या `स्ट्रीट व्ह्यू`च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर ताजमहालासोबतच भारतातील आणखी ३० ऐतिहासिक स्मारकं अगदी जवळून पाहू शकता.
भारताच्या ऐतिहासिक स्थळांना गुगलनं आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचं काम केलंय. `आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया`सोबत (एएसआय) गुगलनं भारताच्या ऐतिहासिक जागांची ३६० अंशातील ऑनलाईन इमेज जाहीर करण्याची घोषणा केलीय.
गुगलकडून अशी तब्बल १०० स्मारकं ऑनलाईन दाखवण्याचा निर्णय घेतलाय. त्यापैंकी ३० ठिकाणं गुरुवारपासून ऑनलाईन पाहता येणार आहेत.
यापूर्वी, ताजमहाला, हुमायूँचा मकबरा, लाल किल्ला आणि आग्र्याचा किल्ला यांना गुगल मॅप्स आणि गुगल कल्चरल इन्स्टिट्यूटवर जाहीर करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.