www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
चायना मोबाईल बाजारपेठेत ‘जीओनी ईलाईफ ई-७ मिनी’ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बाजापेठेत १८,९९९ रुपये इतकी किमंत निर्धारीत करण्यात आलीय.
भारतात मात्र, अजूनही ‘ई-लाईफ ई-७ मिनी’ हा स्मार्टफोन अधिकृतरित्या उपलब्ध झालेला नाही. ‘ई-लाईफ ई-७ मिनी’ या स्मार्टफोनमध्ये डबल सिमकार्डची (जीएसएम + जीएसएम) सुविधा आहे. ‘अँन्ड्रॉईड ४.२ जेलीबीन’ ऑपरेटींग सिस्टम यासाठी वापरण्यात आलीय... तसंच या स्मार्टफोनमध्ये १.७ गीगाहर्ट्स ऑक्टा-कोअर प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच २ जीबी रॅमबरोबर ४.७ इंचाचा डिसप्ले देण्यात आलेला आहे.
‘ई-लाईफ ई ७ मिनी’ या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेऱ्याची सोय नाही, पण, त्याची कमतरता भरून काढण्यासाठी १३ मेगापिक्सल कॅमेराच तुम्हाला हवा तसा फिरू शकेल, अशी सोय उपलब्ध करून देण्यात आलीय. हा स्मार्टफोन सध्या दोन रंगात उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये –
डबल सिमकार्ड (जीएसएम+जीएसएम)
२ जीबी रॅम
अँन्ड्रॉईड ४.२ गीगाहर्टझ् जेलीबीन
४.७ - इंचाचा डिसप्ले
१.७ गीगाहर्ट्स ऑक्टा-कोअर प्रोसेसर
१३ मेगापिक्सल कॅमेरा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.