स्मार्टफोन हरवला.. तर आता टेन्शन नको

स्मार्टफोन ही आजकाळाची गरज झाली आहे. एखाद्या पर्सनल सेक्रेटरीप्रमाणे आपली बरीचशी कामे स्मार्टफोन हा हलकी करतो. त्यात आपला महत्त्वपूर्ण डेटा असतोच, पण त्याबरोबरच कॉन्टॅक्ट नंबर्सही स्टोर केलेले असतात. डेटा बॅंकअपची सुविधा असली तरी आपला स्मार्टफोन अचानक हरवला तर आपला डेटा चोराला मिळून तो त्याचा गैरवापर करण्याची भीती आपल्याला नक्कीच वाटते. त्यामुळे ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने यावर तोडगा शोधला आहे.

Updated: Dec 25, 2013, 01:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्मार्टफोन ही आजकाळाची गरज झाली आहे. एखाद्या पर्सनल सेक्रेटरीप्रमाणे आपली बरीचशी कामे स्मार्टफोन हा हलकी करतो. त्यात आपला महत्त्वपूर्ण डेटा असतोच, पण त्याबरोबरच कॉन्टॅक्ट नंबर्सही स्टोर केलेले असतात. डेटा बॅंकअपची सुविधा असली तरी आपला स्मार्टफोन अचानक हरवला तर आपला डेटा चोराला मिळून तो त्याचा गैरवापर करण्याची भीती आपल्याला नक्कीच वाटते. त्यामुळे ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने यावर तोडगा शोधला आहे.
ब्लॅकबेरी कंपनीचा मोबाईल हरवला तर तत्काळ आपला डेटा ऑनलाइन उडवण्याची सोय ब्लॅकबेरी कंपनीने केली आहे. मात्र त्यासाठी यूजरने ब्लॅकबेरी प्रोटेक्ट सक्रिय करणे गरजेचे आहे. समजा तुमचा ब्लॅकबेरी हॅण्डसेट हरवला तर चोर आपले सीमकार्ड काढून टाकणार हे सरळ आहे. पण घाबरण्याचे कारण नाही.
तुम्ही लगेच ब्लॅकबेरीच्या वेबसाइटवर जाऊन ब्लॅकबेरी आयडी टाकून तुम्ही आपल्या डिव्हइसवर रिंग करु शकता आणि मेसेजही टाकू शकतात. एवढेच नाही तर आपल्या हॅण्डसेटचा पासवर्ड ऑनलाइन बदलूही शकता. एकदा पासवर्ड बदलला की चोराला तुमच्या डिव्हाइसमधील डेटाचा दुरुपयोग करणे शक्यच होत नाही. असे ब्लॅकबेरी कंपनीने सांगितले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.