जियोनीचा सर्वात हलक्या वजनाचा CTRL V5 स्मार्टफोन

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी चीनी कंपनी जियोनीने एक शानदार आणि वजनाने हलका असा ड्युयल सिम स्मार्टफोन CTRL V5 बाजारात आणला आहे.

Updated: Apr 30, 2014, 06:31 PM IST

WWW.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल हॅण्डसेट बनवणारी चीनी कंपनी जियोनीने एक शानदार आणि वजनाने हलका असा ड्युयल सिम स्मार्टफोन CTRL V5 बाजारात आणला आहे. क्वाड कोर प्रोसेसर असणारा स्मार्टफोन 12 हजार 999 रूपये किमतीचा आहे. कंपनीच्या वेबसाईटवर हँडसेटविषयी माहिती देण्यात आली आहे.
1.3 गीगाहर्टझ एमटीके प्लेफॉर्म वर एमटी 6582 VX हा सिपसेट युक्त प्रोससर आहे. हा स्मार्टफोन एंड्रॉयड 4.2 जेली बीन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. जियोनीच्या या स्मार्टफोनमध्ये 4.7 इंचाची कॅपेसिटीव्ह टच स्क्रीन आहे, या फोनला 960 X 540 पिक्सेलचं रिझोल्यूशन आहे.
स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल रॅम स्टोरेज क्षमता आहे. याशिवाय मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखिल आहे. या स्लॉटमुळे मेमरी 32 जीबी पर्यंत वाढवण्यात येऊ शकते. या फोनमध्ये एलईडी फ्लॅश लाईटसह 0 मेगा पिक्सेलचा रियर आणि 2 मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनचं वजन 103 ग्रॅम आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.