www.24taas.com, मुंबई
‘हल्ली कुछ भी कर और फेसबुक पर डाल’ अशी म्हण ज्माला आली आहे. आपल्या मनातील इच्छा, विचार, अनुभव शेअर करण्यासाठी लोक फेसबुकचा जास्त वापर करतात. पण फेसबुकवर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त लिहिलं तर वाचणार कोण, असा प्रश्न पडतो. यावर फेसबुकनेच उत्तर शोधलं आहे.
यासाठी फेसबुकने स्वतंत्र अप्लिकेशन तयार केलं आहे . याला सोशल फेसबुक स्टोरीज अॅप असे म्हटले आहे . या अॅपवर आपण क्लिक केल्यानंतर आपण थेट FacebookStories.com वेबसाइटवर पोहोचतो . यामध्ये आपण फेसबुकशी संबंधित आपले अनुभव शेअर करू शकतो . यासाठी यावर वेगवेळ्या थीम्स देण्यात येतात. त्यानुसार आपण एखादी गोष्ट तिथे शेअर करू शकतो.
विषयाला धरून व्हिडीओ , फोटोही येथे शेअर करता येतात. याशिवाय यामध्ये विविध लोकांनी वाचलेल्या पुस्तकांची माहितीही उपलब्ध आहे. यासाठी बुकशेल्फ नावाचे वेगळे सदर आहे . याचबरोबर न्यूयॉर्कर या जगद्विख्यात प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांचे अर्काइव्हही इथे वाचावयास मिळतात . याशिवाय जुनी लोकप्रिय गाणीही येथे ऐकावयास आणि डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.