फेसबुकचं व्यसन, सोडवण्यासाठी बापाने दिले अजब वचन

आपल्या मुलीला फेसबुकचे व्यसन लागू नये, तसेच तिचे अभ्यासातील लक्ष कमी होऊ नये म्हणून मॅसॅच्युसेट येथील एका व्यक्तीने मुलीला फेसबुकपासून दूर राहण्यासाठी २०० डॉलर्स पॉकेटमनी देण्याचा चक्क लेखी करार केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 11, 2013, 08:12 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
आपल्या मुलीला फेसबुकचे व्यसन लागू नये, तसेच तिचे अभ्यासातील लक्ष कमी होऊ नये म्हणून मॅसॅच्युसेट येथील एका व्यक्तीने मुलीला फेसबुकपासून दूर राहण्यासाठी २०० डॉलर्स पॉकेटमनी देण्याचा चक्क लेखी करार केला आहे.
पॉल बईर असे त्या व्यक्तीचे नाव असून बोस्टनमध्ये त्यांची स्वत:ची कंपनी चालवतात. बईर यांनी ही गोष्ट आपल्या ब्लॉगवरून जाहीर केली असून सोबत ‘फेसबुक डिऍक्टिवेशन करारा’चे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.
तसेच ही आयडिया त्यांची मुलगी राशेल हिचीच असून वेळेचा अपव्यय टाळावा आणि सोबत चांगली पॉकेटमनीदेखील मिळावी म्हणून राशेलनेच या कराराची आयडिया आपल्या वडिलांना सुचविल्याचे बईर यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.