विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
परीक्षा म्हटलं सर्वांनाच टेन्शन येतं. खूप अभ्यास करून पेपर लिहिण्याचा सर्वच जण प्रयत्न करतात. मात्र औरंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यांनं काहीतरी वेगळाच प्रयत्न केलाय.
ये दिल, तुम बिन कही लगता नही क्या करे...
तुमसे अच्छा कौन है....
बीएस्सीच्या पेपरमध्ये उत्तरं लिहिण्याऐवजी औरंगाबाद विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्यांनं चक्क उत्तरपत्रिकेत अशी गाणी लिहिली आहेत. झूलॉजीच्या पेपरमध्ये थायरॉईड ग्लॅंडबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यानं ही गाणी लिहिली आहेत. परीक्षेतल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून या पठ्ठ्यानं अशी अंताक्षरी खेळली आहे. या विद्यार्थ्याचं असं संगीतप्रेम पाहून परीक्षकही चक्रावले आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे शून्य मार्क्सही दिले... मात्र आपल्याला शून्य मार्क का दिले असा सवाल या बहाद्दरानं विद्यापीठाला विचारला... पुर्नतपासणीदरम्यान या संगीतमय पेपरचा पर्दाफाश झाला.
विद्यापीठात दरवर्षी पेपर तपासण्याबाबत अंसख्य तक्रारी येतात मात्र अनेक तक्रारीत तथ्य नसतं ते या तक्रारीतून स्पष्ट झाल्याचं कुलगूरूंनी म्हटलंय. तरूणांच्या ओठावरच्या गाण्यांवरून त्या देशाचं भविष्य सांगता येतं. असं म्हटलं जातं. मात्र पेपरमध्ये सिनेमाची गाणी लिहिल्यानं परीक्षकांनी भोपळा देऊन या मुलाचं भविष्य मात्र निश्चित केलंय...