www.24taas.com, कोलंबो
टी-२० विश्व चषकातील सुपर ८ मधील आठ संघांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये साखळीतील एक सामना शिल्लक असला तरी बांग्लादेशने हा सामना जरी जिंकला तरी रन रेटच्या आधारावर पाकिस्तानच सुपर ८ मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहे, परंतु चांगल्या रन रेटमुळे या संघाने यापूर्वीच सुपर ८मध्ये स्थान पटकावले आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +0.650 आहे. तसेच त्यांना अजून एक सामना खेळायचा आहे.
दुसरीकडे बांग्लादेशचा नेट रन रेट -2.950 आहे, हा पाकिस्तानच्या तुलनेत फारच कमी आहे. सुपर ८ मध्ये बांग्लादेशला पोहचायचं असेल तर त्याला पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागले, सध्याची परिस्थिती पाहता हे अशक्य दिसते.
या सामन्यात पाऊस पडला तर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार पाक संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल.
सुपर ८चे आठ संघ दोन ग्रुपमध्ये विभाजीत करण्यात आले आहेत. यात ग्रुप १ मध्ये इंग्लड, वेस्टइंडिज, श्रीलंका आणि न्यूझीलंड आहे. तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान (क्वालाफाय करावे लागेल) ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेचा संघ आहे.
ग्रुप ए मधून इंग्लड आणि भारत, ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज, ग्रुप सी मधून श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आणि ग्रुड डीमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांना सुपर ८ मध्ये प्रवेश मिळाला आहे.
गत विजेता असल्यामुळे इंग्लड ए-१ कोड देण्यात आला आहे, गत वर्षी फायनलमध्ये पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला बी-१ कोड देण्यात आला आहे. सेमी फायनलमध्ये पोहचणाऱ्या श्रीलंकेला सी-१ तर पाकिस्तानला डी-१ कोड देण्यात आला आहे. त्यानंतर भारताला ए-२, वेस्ट इंडिजला बी-२, दक्षिण आफ्रिकेला- सी-२ आणि न्यूझीलंडला डी-२ कोड देण्यात आला आहे.
सुपर ८मध्ये प्रत्येक संघाचे तीन सामने होणार आहेत. यातील दोन ग्रुप मधील उत्कृष्ठ चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. समजा दोन संघाचे समान अंक झाले तर चांगल्या रन रेटच्या आधारावर त्यांना पुढे स्थान देण्यात येणार आहे. सुपर ८ मध्ये मागील साखळी सामन्यांचा रन रेट लक्षात घेतला जाणार नाही.