वानखेडेवर युवराजने जेव्हा सचिनचे पाय धरले

इंडियन प्रीमियर लीगच्या आठव्या सिझनमध्ये सचिन आपली टीम मुंबई इंडियन्स सोबत आहे. यावेळी मुंबईच्या वानखेडेवर अचानक युवराज सिंहने सचिन तेंडुलकरचे मैदानात पाय धरले. 

Updated: May 6, 2015, 01:40 PM IST
वानखेडेवर युवराजने जेव्हा सचिनचे पाय धरले title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या आठव्या सिझनमध्ये सचिन आपली टीम मुंबई इंडियन्स सोबत आहे. यावेळी मुंबईच्या वानखेडेवर अचानक युवराज सिंहने सचिन तेंडुलकरचे मैदानात पाय धरले. 

युवराज सिंह दिल्ली डेअर डेविल्सकडून खेळतोय. तरीही गंमतीत युवराज सिंहने सचिनचे पाय धरले,  सचिनने आपले पाय सोडवण्याचा प्रयत्न केला. सचिनने युवराजचे पाया पडण्याची ही पहिली वेळ नव्हती यापूर्वीही युवराजने सचिनचा पायापडला आहे.

मेलबर्नमध्ये मागील वर्षी झालेल्या एका खास सामन्यात युवराज सचिनच्या पायापडला होता. एका मुलाखतीत युवराज म्हणाला होता, मी सचिनला माझा मोठा भाऊ मानतो.

टीम इंडियाने २०११ साली वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हा युवराज आणि सचिन हे दोन्ही टीम इंडियात होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.