गावस्करांच्या विधानावर युसूफची नाराजी

युसुफ पठाणच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला.

Updated: May 3, 2016, 01:23 PM IST
गावस्करांच्या विधानावर युसूफची नाराजी title=

बंगळूरु : युसुफ पठाणच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची गोलंदाजी पोपटवाडी आक्रमण असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांच्या या विधानाला युसूफ पठाणने असहमती दर्शवलीये.

पठाणने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गावस्कर यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. जेव्हा आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत संघ खेळतात तेव्हा कोणताही संघ, फलंदाजीचा क्रम आणि अथवा गोलंदाजी पोपटवाडी आक्रमण असू शकत नाही, असे युसूफ म्हणाला.

हा त्यांचा दृष्टिकोन होता. ते त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार बोलले. मात्र वरुण आरोन आणि शेन वॉटसनकडे पाहा. या दोघांनी आपल्या देशाचे नेतृत्व केले आहे, असेही पुढे युसूफने सांगितले.