नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मैदानावर असताना अथवा मैदानाबाहेर कधीच कोणीच चिडलेले पाहिले नाही. तो नेहमी संयमी खेळीने मैदानावरील टीकाकारांना उत्तर द्यायचा मात्र शांत दिसणारा हा सचिन एकदा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेलवर चांगलाच भडकला आणि सचिनने त्यांना चांगलेच सुनावलेही होते.
सचिनची आत्मकथा 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचे लेखक बोरिया मजुमदार यांनी एका कार्यक्रमादरम्यान हा किस्सा सांगितला. मास्टर ब्लास्टर सचिन एकदा जिममध्ये वर्कआउट करत होता. त्यावेळी तिनेथ इयान चॅपेलला त्याने पाहिले. चॅपेल यांनी सचिनला वर्कआउट करताना पाहिले आणि म्हणाले, अच्छा तर हे गुपित आहे.
यापूर्वी इयान चॅपेल यांनी सचिनविरोधात अनेकदा विधान केले होते. सचिनने आरशात पाहिले पाहिजे आणि क्रिकेटमधील करियरबाबत विचार करावा असे म्हटले होते.यामुळे याचा राग सचिनच्या मनात होता. त्यामुळे वर्कआउटदरम्यान चॅपेल यांच्या विधानांनंतर सचिनला आपला राग आवरला नाही आणि त्याने चॅपेल यांना खडतर शब्दात सुनावले.
'तुम्ही लोक सोयीनुसार बोलण्याची पद्धत बदलता. सर्व समस्या तुमच्या भावामुळे (ग्रेग चॅपेल) निर्माण झाल्यात. त्यांनी भारतीय क्रिकेटला पाच वर्ष मागे नेलं', या शब्दात सचिनने चॅपेल यांना सुनावलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.