वर्ल्ड कप | टीम इंडियाचं सर्वात वेगवान आक्रमण : ब्रेट ली

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान बॉलर ब्रेट लीने टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक केलं आहे, टीम इंडियाची ही आतापर्यंतची सर्वात आक्रमक बॉलरची फळी असल्याचं  म्हटलं आहे.

Updated: Mar 24, 2015, 04:37 PM IST
वर्ल्ड कप | टीम इंडियाचं सर्वात वेगवान आक्रमण : ब्रेट ली title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान बॉलर ब्रेट लीने टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक केलं आहे, टीम इंडियाची ही आतापर्यंतची सर्वात आक्रमक बॉलरची फळी असल्याचं  म्हटलं आहे.

ब्रेट लीने कौतुक करतांना म्हटलं आहे, वेगवान बॉलर्सच्या हा त्रिकुटात सर्वात प्रभावी बॉलर मोहम्मद शमी आहे, तर भारताच्या वेगवान बॉलर्सच्या आक्रमणात शमी, उमेश यादव आणि रोहित शर्माचा समावेश आहे, आतापर्यंत ७० ते ४२ विकेट घेतल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट वेगवान बॉलर्सचं त्रिकूट
ब्रेट ली म्हणतो, "शमी, यादव आणि मोहित हे टीम इंडियाच्या बॉलर्सचं त्रिकूट आतापर्यंतचं प्रभावी त्रिकूट आहे. हे बॉलर्स जेव्हा लय आणि वेगात असतात, तेव्हा त्यांचा वेग १४५ किमी प्रति तास असतो. जर त्यांनी योग्य दिशेने बॉलिंग केली तर त्यांना विकेट मिळण्यास अडचण नाही." 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतांना सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या लीने शमीची वाहवा केली आहे. शमीचं कौतुक या आधी ब्रेट लीने  केलं होतं, कोलकाता नाईट रायडर्सकडून  खेळतांना ब्रेट लीने शमीला अनुभवलं होतं.

सध्या शमी सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू
मोहमद शमीने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत, तो एक शानदार खेळाडू आहे, बॉलिंग करतांना तो आक्रमकता धारण करतो. उमेश यादव संतुलित वेगाने गोलंदाजी करतो, यामुळे जिंकण्यासाठी भारताकडे चांगली संधी आहे.

टीम इंडियाला विजयाचा सूर गवसलाय
भारताकडे सामना जिंकण्याची संधी आहे, मी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू असल्याने ऑस्ट्रेलियाचं समर्थन करेल पण, टीम इंडिया बेस्ट आहे, आणि त्यांना सूर गवसलाय. हा सामना अतिशय तोलामोलाचा होणार असल्याने गुरूवारच्या सामन्यासाठी मी उत्साही असल्याचंही ब्रेट ली ने म्हटलं आहे.

धिम्या पिचचा भारताला फायदा
ब्रेट ली म्हणतो आतापर्यंत मी पिच पाहिलेली नाही, पण मी वाचलंय पिच खूप धिमी असणार आहे, मागील सामन्यातही पिच धिमी होती तो सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, यात स्पिनर चांगली भूमिका पार पाडू शकतात, जे भारताला फायदेशीर ठरणार आहे.

विराट कोहली विषयी ब्रेट ली म्हणतो...
"विराट कोहलीची खेळ या सामन्याची दिशा बदलू शकतो, कारण विराट सध्या चांगला खेळणार खेळाडू आहे, विराट जागतिक दर्जाचा खेळाडू असल्याचं त्याने मागील काही सामन्यांमध्ये सिद्ध केलं आहे. विराटकडे खेळण्याचं तंत्र आहे, आणि त्याला दबाव बनवता येतो, मोठ्या संकटातही तो चांगलं प्रदर्शन करू शकतो, सेमीफायनलमध्ये त्याच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असेल कारण त्याला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणं आवडतं".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.