...तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया फायनलला

एकिकडे ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनलचा सामना होतोय, आणि दुसरीकडे सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत.

Updated: Mar 24, 2015, 12:30 PM IST
...तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया फायनलला title=

ऑकलंड : एकिकडे ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनलचा सामना होतोय, आणि दुसरीकडे सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत.

चर्चा या मुद्यावर होते आहे की, जर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील २६ मार्चच्या सामन्यात, म्हणजेच सेमी फायनलमध्ये पावसाचं पाणी फिरलं, तर काय होईल? मंगळवारी सिडनीत पाऊस झाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

भारताजवळ मौका
तसं पाहिलं तर यासाठी आयसीसीने नॉक ऑऊटवर एक उपाय ठेवला आहे, रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. जर हा सामना पावसामुळे २६ मार्च रोजी खेळता आला नाही, तर तो २७ मार्च रोजी खेळवला जाईल.

पण पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, जर हा सामना २७ मार्च रोजीही पावसामुळे खेळता आला नाही तर मग काय?

या प्रश्नाचं उत्तर भारताच्या बाजूने असू शकतं, कारण अशी परिस्थिती निर्माण झाली तर भारताला फायनलमध्ये प्रवेश मिळेल, कारण लीग सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा भारताने चांगली खेळी केली आहे. भारत आपल्या पूलमध्ये आघाडीवर आहे, तर ऑस्ट्रेलिया पूल ए मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.