नवी दिल्ली : लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा क्रिकेट विश्वातला रोमांचक सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच... हीच मॅच आता क्रिकेटप्रेमींना अगदी फ्रीमध्ये म्हणजेच दूरदर्शनवर पाहता येणार आहे.
सुप्रीम कोर्टानं रविवारी खेळल्या जाणाऱ्या या मॅचचं लाईव्ह फीड केबल ऑपरेटर्ससोबत दूरदर्शनलाही दाखविण्यास परवानगी दिलीय. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध प्रसार भारतीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिलाय. दिल्ली हायकोर्टानं प्रसार भारतीला मॅचचं लाईव्ह फीड दाखवण्यास मनाई केली होती.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि स्टार इंडिया लिमिटेड यांना मात्र या निर्णयामुळे धक्का बसलाय.
केबल टेलिव्हिजन नेटवर्क अधिनियमच्या कलम आठनुसार, सर्वच केबल ऑपरेटर्ससाठी दूरदर्शनचे कमीत कमी दोन चॅनल मोफत दाखवणं अनिवार्य आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.