मुंबई : एबी डिविलियर्स समोर खेळताना प्रतिस्पर्धी खेळाडूचा त्याच्यासमोर टिकाव लागणं जरा मुश्किलच... पण, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या मॅचमध्ये हा करिश्मा पाहायला मिळाला.
अफगाणिस्तानचा पराभव क्रिकेटरसिकांना पक्का वाटत असतानाच अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादननं साऊफ आफ्रिकेला डिविलियर्सच्या अंदाजातच प्रत्यूत्तर दिलं. त्याचा याच मॅचमधला 'हेलिकॉप्टर शॉट' सध्या वायरल झालाय.
२८ वर्षीय मोहम्मद शहजाद धोनीला आपला आदर्श मानतो... आणि धोनीप्रमाणेच तोही 'हेलिकॉप्टर शॉट' खेळतो. अनेकदा आपल्या टीमसाठी तो धोनीप्रमाणेच संकटमोचक ठरलाय. शाहजादमुळेच टी२० वर्ल्डकपमध्ये अफगानिस्तानच्या टीमला अनेकांकडून वाहवा मिळाली.
या टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त रन्स बनवणारा शहजाद दुसऱ्या क्रमांकावरचा खेळाडू ठरलाय. त्यानं ७ मॅचमध्ये एका हाफ सेन्चुरीसह २२२ रन्स बनवलेत.