व्हिडिओ : कोहलीनं ठोकली सेन्चुरी... किवी लागले नाचायला!

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच्या पहिल्या दिवशीच एक अजब सीन पाहायला मिळाला... 

Updated: Oct 12, 2016, 08:35 AM IST
व्हिडिओ : कोहलीनं ठोकली सेन्चुरी... किवी लागले नाचायला! title=

मुंबई : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच्या पहिल्या दिवशीच एक अजब सीन पाहायला मिळाला... 

भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं सेन्चुरी ठोकली... आणि त्याच्या या सेन्चुरीवर टीम इंडिया नाही तर किवी नाचायला लागले... त्यामुळे क्षणभर विराटही चांगलाच भांबावला होता. 

त्याचं झालं असं की, सेन्चुरी मारण्यासाठी विराटनं रिस्की सिंगल घेतला आणि डाइव्ह मारत पूर्ण केला. किवी फिल्डरनं हा बॉल डायरेक्ट थ्रो केला आणि विराटला आऊट केल्याच्या आनंदात संपूर्ण किवी टीम जल्लोष करू लागली...

यावेळी विराटही थोडा भांबावला पण आपण आऊट नसल्याचं कदाचित त्याला ठाऊक होतं... त्यामुळे तो थर्ड अम्पायरच्या निकालाची वाट पाहत होता... थोड्याच वेळात त्याला थर्ड अम्पायरकडून नॉट आऊट मिळाला... आणि किवी टीमचा जल्लोष वाया गेला... विराटची सेन्चुरी पूर्ण झाली होती.