आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे. 

Updated: Oct 11, 2016, 06:51 PM IST
आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे title=

इंदूर : भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे. 
 
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची गदा ही 2001 मध्ये तयार केली गेली होती. 30000 पाउंड किंमतीची ही गदा पहिल्या स्थानावर असलेल्या टीमकडे दिली जाते. याआधी मागील महिन्यात पाकिस्‍तान टेस्‍ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता. त्यावेळेस कर्णधार मिसबाह उल हककडे ही गदा सोपवली गेली होती. 

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसनने गद्दाफी स्टेडियम मध्ये मिस्‍बाहकडे ही गदा सोपवली होती. आस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतानंतर पाकिस्तान हा पाचवा संघ आहे जो आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आहे.