आम्ही आमच्या अडचणी वाढवायच्या पद्धती शोधून काढल्यात - धोनी

'कठिण काळात टीम इंडिया आपल्याला आणखी अडचणीत आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे' असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय. निवृत्ती घोषित करण्यापूर्वी भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनीनं तिसरी टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर बोर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर धोनीनं हा टोमणा आपल्या टीमला मारलाय.

Updated: Dec 30, 2014, 05:58 PM IST
आम्ही आमच्या अडचणी वाढवायच्या पद्धती शोधून काढल्यात - धोनी title=

मेलबर्न : 'कठिण काळात टीम इंडिया आपल्याला आणखी अडचणीत आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे' असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय. निवृत्ती घोषित करण्यापूर्वी भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनीनं तिसरी टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर बोर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर धोनीनं हा टोमणा आपल्या टीमला मारलाय.

ऑस्ट्रेलियानं समोर ठेवलेल्या 384 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं जेव्हा एमसीजीवर सहा विकेटसवर केवळ 174 रन्स दिले. यावेळी, दोन्ही कॅप्टन्स मॅच ड्रॉ करण्यासाठी तयार झाले होते... आणि यानंतर साहजिकच ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा बोर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. याबद्दल बोलताना या परिणामांसाठी टीम स्वत:च जबाबदार आहे, असंही धोनीनं म्हटलंय. 

आम्ही स्वत:च्या अडचणी वाढवण्यासाठीचे सगळ्या पद्धती शोधून काढल्यात. आत्तापर्यंत जवळपास सगळ्याच टेस्ट मॅचमध्ये आम्ही चांगलं खेळलो... नंतर अचानक काही विकेटस् गमावले आणि स्वत:वरचा दबाव वाढवला, अशीही कबुली धोनीनं दिलीय. 

खूप ढीले शॉट खेळले गेले पण मला वाटतं यापद्धतीच्या मॅचमध्ये हे खूप महत्त्वपूर्म असतं की जेव्हा तुम्ही वरच्या स्थानावर असाल तेव्हा तुमची लय कायम ठेवायला हवी आणि पुढे सरकायला हवं... हे सुनिश्चित करायला हवं की येणाऱ्या बॅटसमनला अधिक दबावाचा सामना करावा लागू नये. अॅडलेडमध्ये पहिली टेस्ट 48 रन्स तर ब्रिस्बेनमध्ये दुसरी टेस्ट चार विकेटनं गमावल्यानंतर धोनीनं तिसरी टेस्ट ड्रॉ करणं दिलासा दिणारं होतं, असं धोनीनं म्हटलंय. मी या ड्रॉमुळे खूश आहे... याचं एकमात्र कारण म्हणजे अंतिम दिवशी आम्ही स्वत:ला अडचणीत टाकलं होतं. पण, मला वाटतं की बॉलर्सनं चांगली कामगिरी केली.  

नियमित कॅप्टन मायकल क्लार्क जखमी झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीमची धुरा सांभाळणाऱ्या स्मिथनं 99 रन्सवर शॉन मार्श बाद झाल्यानंतर लगेचच डाव घोषित केला पण त्यानं हा सांघिक खेळ असून व्यक्तीगत फायद्याचा काहीही फरक पडत नाही, असं म्हटलंय. 

ईमानदारीत सांगायचं तर, शॉर्न मार्श नाही पण ही सीरिज खूप महत्त्वाची होती. आम्ही अशाच पद्धतीनं खेळतो. हा एक सांघिक खेळ आहे. आम्ही विचार केला की आपण इतरांना संधी द्यायचीय तर ते जिंकण्यासाठी प्रयत्न करू शकतात. स्मिथ कॅप्टनच्या रुपात आपली पहिली सीरिज जिंकल्यामुळे खूश आहे. सपाट पिचवर आमच्यासाठी पाच दिवस कठिण होते. आम्ही चांगली सुरुवात केली. आम्ही मैदानावर काही संधी गमावल्या. काही कॅच सोडल्या ज्याचा परिणाम पूर्म मॅच दरम्यान पाहायला मिळाला. भारतानं चांगलं क्रिकेट खेळलं. पण, शेवटी मॅच न जिंकल्यानं थोडी निराशा झालीय, असं धोनीनं यावेळी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.