आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो : मिसबाह

आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे. 

Updated: Mar 16, 2015, 05:16 PM IST
आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो :  मिसबाह title=

अॅडीलेड : आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे. 

पूल बी च्या सामन्यात आयर्लंडला सात विकेटने पराभूत केल्यावर मिसबाह बोलला, आता शक्य आहे की आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो. आम्ही लयमध्ये आहोत. गोलंदाजीही चांगली करीत आहे. फलंदाजांनीही चांगली भूमिका बजावण्यास सुरूवात केली आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज सामने गमावल्यानंतर लगोपाठ चार सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा क्वार्टर फायनलचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

चांगला दिवस असेल तर आम्ही ऑस्ट्रेलियाला नमवू शकतो असे मिसबाहने सांगितले. 

कोणत्याही दिवशी काहीही होऊ शकते. आमच्याकडे असे गोलंदाजीचे आक्रमण आहे की त्याने कोणालाही हैराण करू शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.