टीममध्ये योग्य ताळमेळ बसत नाही : रोहित शर्मा

आयपीएलच्या चालू सत्रात योग्य तो ताळमेळ बसलेला नाही. तो शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र आम्हाल अजून यश मिळालं नाही, असं  सलग चौथ्या पराभवानंतर निराश झालेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे.

Updated: Apr 18, 2015, 02:21 PM IST
 टीममध्ये योग्य ताळमेळ बसत नाही : रोहित शर्मा title=

मुंबई : आयपीएलच्या चालू सत्रात योग्य तो ताळमेळ बसलेला नाही. तो शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र आम्हाल अजून यश मिळालं नाही, असं  सलग चौथ्या पराभवानंतर निराश झालेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे.

सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, आम्हाला विचार करण्याची गरज आहे. योग्य ताळमेळ का बसत नाही. अजूनही आम्ही टीमबरोबर ताळमेळ बसविण्यात प्रयत्न करीत आहोत. आम्ही पाच बॉलर वापरले, बॅटिंग ऑर्डर बदलून पाहिली, मात्र आम्हाला यश आले नाही. न्यूझीलंडच्या कोरी अॅंडरसनला तिसऱ्या नंबरवर पाठवूनसुद्धा काही फायदा झाला नाही.

नियोजनात अपयश आलं की, हे सर्व चुकीचे वाटते. मात्र  नियोजन बरोबर होते. त्याचवेळी रोहित म्हणाला, पुढील सामन्यात न्यूझीलंडच्या मिशेल मॅकग्लिनागनला खेळवलं जाऊ शकतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.