रसेलच्या या बॉलमुळे वॉटसन वैतागला

आयपीएलच्या याआधीच्या मोसमामध्ये कोलकत्याच्या आंद्रे रसेलनं टाकलेल्या एका बॉलवर शेन वॉटसन चांगलाच भडकला. 

Updated: May 10, 2016, 08:20 PM IST
रसेलच्या या बॉलमुळे वॉटसन वैतागला title=

मुंबई: आयपीएलच्या याआधीच्या मोसमामध्ये कोलकत्याच्या आंद्रे रसेलनं टाकलेल्या एका बॉलवर शेन वॉटसन चांगलाच भडकला. आंद्रे रसेलचा हा बॉल पाहून अंपायरलाही काही कळलं नाही. 

आयपीएलची ही मॅच राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये झाली होती. बॉल टाकताना रसेल मध्येच थांबला, त्यामुळे रसेल बॉल टाकणार नाही असं वॉटसनला वाटलं. पण रसेलनं मात्र बॉल टाकला आणि वॉटसनचा राग अनावर झाला. 

पाहा रसेलनं टाकलेला हा बॉल