आयपीएलमधील १३ टीमचा रेकॉर्ड, मुंबई होणार नंबर १

देशात २००८पासून टी-२० इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरु झाली. सध्या नववा सिजन सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षांची बंदी असल्याने यावर्षी दोन नवे संघ दाखल झालेत.

Updated: May 10, 2016, 07:22 PM IST
आयपीएलमधील १३ टीमचा रेकॉर्ड, मुंबई होणार नंबर १ title=

मुंबई : देशात २००८पासून टी-२० इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरु झाली. सध्या नववा सिजन सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षांची बंदी असल्याने यावर्षी दोन नवे संघ दाखल झालेत.

कोणी कधी जिंकला चषक

रायझिंग पुणे सुपरजाएंटंस आणि गुजरात लॉयन्स हे या सिझनचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत १३ टीम खेळण्यास संधी मिळाली आहे. दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स  बंगळुरु या पाच संघाना संधी मिळाली. चेन्नई (२०१०, २०११), कोलताता (२०१२,२०१४), मुंबई इंडियन्स (२०१३,२०१५) यांनी २-२ आणि राजस्थान (२००८) तसेच डेक्कन चार्लस (२००९) मध्ये प्रत्येकी एकवेळा आयपीएल चषक जिंकला.

हा आहे रेकॉर्ड

आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वात जास्त मॅच खेळण्याचा रेकॉर्ड हा मुंबईच्या नावावर आहे. तसेच दोनवेळी आयपीएलवर आपले नाव कोरले आहे. मुंबईने आयपीएलमध्ये चेन्नईला पाठी टाकून सर्वाधिक मॅच जिंकणारी टीम होऊ शकते.