विश्वनाथ आनंद - मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मुकाबला

विश्वनाथ आनंद आणि मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा मुकाबला रंगणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या लढतीत कार्लसननं आनंदवर मात केली होती.

Updated: Nov 8, 2014, 10:24 AM IST
विश्वनाथ आनंद - मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मुकाबला  title=

नवी दिल्ली : विश्वनाथ आनंद आणि मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा मुकाबला रंगणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या लढतीत कार्लसननं आनंदवर मात केली होती.

या पराभवाची परतफेड कऱण्यासाठी आनंद प्रयत्नशील असेल. मॅजिशियन कार्लसन आणि फिनीक्स आनंदमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचे एकूँ 12 राऊंड होणार आहेत. 40 चालींसाठी 120 मिनिटं आणि 20 चालींसाठी 60 मिनिटं देण्यात आली आहेत. 61 व्या चालीनंतर प्रत्येक चालीसाठी 15 मिनिंट आणि 30 जादा सेकंद दिली आहेत.

12 राऊंडनंतर दोघंही बरोबरीत असतील तर विजेता ठरवण्साठी दोघींमध्ये चार जलद डाव खेळवले जातील. यानंतरही बरोबरी राखली तर ब्लिट्झ पद्धतीनं डाव रंगेल. आणि यातून वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.