रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत सुरु झालेला वाद काही संपण्याचे नाव घेत नाही.
दुसऱ्या कसोटीत डीआरएसवरुन कोहली आणि स्मिथ यांच्यात निर्माण झालेला वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही कर्णधारांनी दुसऱ्या कसोटीत जे काही घडले ते विसरुन पुढे जाण्याचे ठरवले होते. मात्र रांची कसोटीतील तिसऱ्या दिवशी असे काही घडले की नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसतायत.
ऑस्ट्रेलियन मीडियाने तर या आगीत तेल ओतण्याचे कामही सुरु केलेय. द सिडनी मॉर्निंग हेराल्ड यांनी कोहलीवर आरोप केलाय की स्टीव्ह स्मिथचा डीआरएस चुकल्याने विराट कोहलीने टाळी वाजवत त्याची खिल्ली उडवली.
तिसऱ्या दिवशी भारताकडून चेतेश्वर पुजारा ५८व्या षटकाला फलंदाजी करताना स्टीव्ह ओकेफीने पुजाराला एलबीडब्लू केल्याचे अपील केले. मात्र अंपायरने ते नाकारले. त्यावेळी स्मिथने डीआरएसचा निर्णय घेतला. मात्र या डीआरएसमध्ये हे अपील फेटाळून लावण्यात आले. जेव्हा पुजारा आऊट नसल्याचे समोर आले तेव्हा कोहली खुश झाला आणि त्याने आनंदाच्या भरात टाळी वाजवली.