धोनीच्या त्या स्पेशल गिफ्टवर काय बोलला कोहली

इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिले होते. 

Updated: Jan 25, 2017, 08:43 AM IST
धोनीच्या त्या स्पेशल गिफ्टवर काय बोलला कोहली title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिले होते. 

इंग्लंडविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर धोनीने विराटला त्या सामन्यात वापरलेल्या चेंडूवर सही करत तो विराटला दिला. या स्पेशल गिफ्टबद्दल पाहा काय म्हणालाय विराट.

धोनी भाईने मला दुसऱ्या सामन्यातील तो मॅच बॉल दिला आणि मला म्हणाला तु कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकलीये. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. तो क्षण खास होता तसेच सही असलेला बॉल मला दिला.