'विराट'चा इशारा... ड्रेसिंग रुममधला वाद दिसला मैदानावर?

बांग्लादेश विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विश्वचषक २०१५ मध्ये बांग्लादेशला धूळ चारणारा भारतीय संघ वनडेमध्ये संपूर्ण सीरीज कशी काय गमाऊ शकते? टीम इंडियासोबत सर्व काही ठीक आहे ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना बुधवारी जिंकला पण सीरीज गमावल्यामुळे कर्णधार धोनी आणि टीम इंडिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

Updated: Jun 25, 2015, 01:00 PM IST
'विराट'चा इशारा... ड्रेसिंग रुममधला वाद दिसला मैदानावर? title=

नवी दिल्ली : बांग्लादेश विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विश्वचषक २०१५ मध्ये बांग्लादेशला धूळ चारणारा भारतीय संघ वनडेमध्ये संपूर्ण सीरीज कशी काय गमाऊ शकते? टीम इंडियासोबत सर्व काही ठीक आहे ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना बुधवारी जिंकला पण सीरीज गमावल्यामुळे कर्णधार धोनी आणि टीम इंडिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

याच पराभवाचं कारण विराट कोहलीच्या तोंडून अखेर बाहेर पडलंय. पण, विराटच्या या वक्तव्यामुळे नवा वादही निर्माण झालाय.

शेवटच्या सामन्यादिवशी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सीरीजदरम्यान टीममधील निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय... आपला या निर्णयांवर आक्षेप असल्याचंही त्यानं म्हटलंय.  

विराटच्या म्हणण्यानुसार निर्णयामध्ये बराच गोंधळ दिसून आला आणि तो मैदानावरही दिसला. आमचे खेळाडू पहिल्या दोन सामन्यात कोणत्याही एका स्पष्ट भूमिकेविना खेळले आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसला आहे. 

नेहमी आम्ही जसं खेळतो तसं मात्र यावेळी टीममधले खेळाडू खेळू शकले नाहीत, असंही विराटनं म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, बुधवारी मीरपूरमध्ये सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या अर्धशतकांच्या साहाय्याने मोठी खेळी उभ्या करणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ७७ धावांचा मोठा विजय नोंदवत बांग्लादेशच्या मनसूब्यावर पाणी फेरलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.