स्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर

महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळची आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळचं आयुर्वेदाचं महत्व स्टेफीच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही माहिती दिली. 

Updated: Jun 24, 2015, 06:07 PM IST
स्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर title=

तिरुअनंतपुरम : महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळची आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळचं आयुर्वेदाचं महत्व स्टेफीच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही माहिती दिली. 

केरळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.  स्टेफी ग्राफ परदेशात केरळच्या आयुर्वेद उपचारांचा प्रसार आणि प्रचार करताना दिसणार आहे.

केरळच्या पर्यटन मंत्रालयाने आधीच यासंबंधी स्टेफी ग्राफ बरोबर चर्चा केली आहे. स्टेफी ग्राफबरोबर करार करण्यासाठी केरळच्या पर्यटन मंत्रालयाने आवश्यक मंजुरी दिली आहे. 

निर्सगाचे भरभरुन देणे लाभलेल्या केरळमध्ये आयुर्वेदीक औषधे मोठया प्रमाणावर आहेत. येथील आयुर्वेदीक उपचारांचा परिणाम लगेच दिसून येत असल्याने, देश-विदेशातून मोठया संख्येने नागरीक येथे आयुर्वेदिक उपचारांसाठी येत असतात.

४६ वर्षीय स्टेफीने १९९९ मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑक्टोंबर २००१ मध्ये तिने माजी अव्वल टेनिसपटू आंद्रे आगासीबरोबर विवाह केला. स्टेफी ग्राफचा जागतिक महिला टेनिसमध्ये स्वत:चा दबदबा होता. २२ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदे तिच्या नावावर आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.